Monday 23 May 2011

Yogeshwaridevi

yogeshwaridevi

mul murti

mul sthan

jayanti view

mukundraj samadhi

samadhi place

shiv lene

temple parisar

श्री योगेश्वरी देवीची आरती

जय देवी जय देवी जय योगेश्वरी |  महिमा कळे तुझा वर्णिता थोरी  || धृ ||
पतितपावन सर्व तीर्थ महाद्वारी | माया मोचन सकाळ माया निवारी |
 साधका सिद्धी वाणेच्या तीरि | तेथील महिमा वर्णू शके वैखरी || ||
सिद्धलिंग स्थळ परम पावन | नरसिंह तीर्थ तेथे नृसिंह वदन |
मुळपीठ रेणागिरी नांदे आपण | संतांचे माहेर ते गोदेवी स्थान || ||
महारुद्र जेथे भैरव अवतार | काळभैरव त्याचा महिमा अपार|
नागझरी तीर्थ तीर्थाचे सार | मार्जन करता दोष होती संहार || ||
अनंतरूप शक्ती तुज योग्य माते |  योगेश्वरी नाम त्रिभुवनी विख्याते |
व्यापक सकळा देही अनंत गुणभरिते | नीळकंठ  ओवाळू कैवल्या माते || || 

स्थान परिचय 
१२ ज्योतिर्लिंगांपैकी प्रसिद्ध स्थान म्हणजे परळी वैजनाथ  .  हे ठिकाण आंबेजोगाई पासून २६ कि. मी. वर बीड जिल्ह्यात येते  . परळी हे गाव ब्रह्मा , वेणू सरस्वती नद्यांच्या शेजारी असून त्यास " कान्तिपुर ", " मध्यरेखा वैजयंती " किंवा " जयंती " या नावाने हि ओळखले जाई .
                              आंबेजोगाई च्या योगेश्वरी देवी चे परळी च्या वैद्यानाथा समवेत विवाह ठरला होता . पण लग्नाची वरातमुहूर्त टळून गेल्यावर पोहचल्याने त्या  सर्व माणसांचे दगडात रुपांतर झाले . अशी आख्यायिका सांगितली जाते . त्यामुळे लग्न झाल्याने आंबेजोगाईला कुमारी देवी मानतात.
                           शिव पुराणातील कथेनुसार , मार्कंडेयास अल्प आयुष्य लाभले होते. परंतु परळी वैद्यानाथाच्या वरदानाने  मार्कंडेयास दीर्घायुष्य  लाभले.
तसेच सत्यवान सावित्री ची कहाणी  हि याच क्षेत्रात घडली . नारायण पर्वतावरील तो वटवृक्ष आज हि आहे . इथे वटेश्वर महादेवाचे मंदिर आहे.
चांगुणा चिलया यांची प्रसिद्ध कहाणी हि याच क्षेत्रात घडली .



No comments:

Post a Comment