Tuesday 24 May 2011

Bodan Kuldharm kulaachar

                              बोडण 

       कोकणस्थ समाजात लग्न कार्य नंतर किंवा मुलगा झाल्यावर घरात देवीचे बोडण करण्याची पद्धत आहे. मंगळवार शुक्रवार प्रमाणेच इतर कोणत्याही वारी बोडण करणेस हरकत नाही, तसेच कोणत्याही महिन्यात(गुरु शुक्रास्तात सुद्धा) करणेस हरकत नाही. एका वेळेस दोनापेक्षा जास्त साठवून करू नये.बोडण हा कुलधर्म कुलाचार म्हणूनच केला जातो. योगेश्वरी देवीच्या भक्तामध्ये कोकणस्थ प्रामुख्याने आहेत. बोडण म्हणजे देवीची कृतज्ञता व्यक्त करण्याचे व पूजा करण्याचा रिवाज आहे. या वेळी घरातील सुवासिनी व बाहेरच्या चार व कुमारिका पूजेसाठी आवश्यक आहेत. या पूजेत कुमारिकेचे महत्व जास्त आहे, कारण योगेश्वरी हि कुमारिका देवी आहे.

                         कहाणी बोडणाची 

आटपाट नगर होते . तिथे एक गरीब ब्राह्मण होता . त्याला दोन सुना होत्या . एक आवडती  दुसरी नावडती होती . आवडतीला घरात ठेवणीतले चांगले चांगले खायला प्यायला देत . चांगले ल्यायला - नेसायला देत , तसे नावडतीला काही करीत  नसत . तिला गोठ्यात ठेवीत , फटके - तुटके नेसायला देत , उष्टमाष्ट खायला देत , असे नावडतीचे हाल होत असत .
                      एके दिवशी कुळधर्म कुळाचार आला , तशी ब्राह्मणाच्या बायकोने बोडणाची तयारी केली . सुवासिंनींना बोलावणे केले . पुढे तिने देवाची पूजा केली . सगळ्याजणींनी मिळून बोडण भरले , कहाणी वाचली . पुढे देवीला नैवेद्य दाखवला . नंतर सर्व माणसे जेवली . नावडतीला उष्टमाष्ट  वाढून दिले . तेव्हा तिला समजले , कि आज घरात बोडण भरले . नावडतीला रडू  आले , कि मला कोणी बोडण भरायला बोलावले नाही . सर्व दिवस तिने उपवास केला . रात्री देवाची प्रार्थना केली   ती झोपी गेली .  

                             रात्री नावडतीला स्वप्न पडले .एक सवाशीण स्वप्नात आली , तिला पाहून नावडती रडू लागली . ती नावडतीला म्हणाली " मुली मुली , रडू नको , घाबरू नको . पटकन कशी उगी राहा . रडण्याचे कारण सांग ! "
                         नावडती म्हणाली " घरात आज बोडण भरलं , मला काही बोलावलं नाही , म्हणून मला अवघड वाटले . " सुवासिंनीने " बर " म्हटले . नावडतीला जागी केली . तिला सांगितले , " उद्या तू गोठ्यात दहीदूध विरजून ठेव . एक खडा मांड , देवी म्हणून त्याची पूजा कर . तू एकटीच बोडण भर . संध्याकाळी गाई गुरांना खाऊ घाल . "
इतके सांगितले  ती नाहीशी झाली . नावडती पुढे जागी झाली , जवळपास पाहू लागली . तो तिथे कोणी नाही . नावडती मनात समजली , कि देवीने दर्शन दिलंयपुन्हा तशीच निजली . 
                     सकाळी उठली , सुवासिंनीने सांगितले तसे दहीदूध विरजून ठेवले . दुसरे  दिवशी पहाटे उठली , अंग धुतले , एक खडा घेतला , देवी म्हणून स्थापना केली , पान फुले वाहून पूजा केली . नंतर लाकडाची काथरवट घेतली . विरजून ठेवलेले दही दुध त्यात घातले .देवीची प्रार्थना केली . पुढे एकटीनेच बोडण भरले .देवीला नैवेद्य दाखविला . घरातून आलेले उष्टमाष्ट जेवण जेवली , भरलेले बोडण झाकून ठेवले . दुपारी गुरांना घेऊन रानात गेली .                      
                       इकडे काय घडले ? नावडतीचा सासरा गोठ्यात आला . झाकलेले काय आहे म्हणून पाहू लागला . लाकडाची काथरवट सोन्याची झाली . आत हिरे - माणके दृष्टीस पडले . बाहेर उडालेल्या ठिपक्यांची मोत्ये झाली .ती त्याने आत आत भरली  . मनात मोठे आश्चर्य केले . नावाद्तीने हि कुठून आणली , म्हणून त्याला काळजी पडली . इतक्यात तिथे नावडती आली ." मुली मुली " म्हणून तिला हाक मारली .  लाकडाची काथरवट तिच्या पुढे आणली . हिरे - मोत्ये दाखविले . " हि तू कुठून आणलीस ? " म्हणून विचारले . नावडतीने  स्वप्न सांगितले " त्याप्रमाणे मी बोडण भरलेते हे झाकून ठेवले , त्यांचे हे असे झाले ,काय असेल ते पाहून घ्या . " म्हणून म्हणाली . सासरा मनात ओशाळा झाला .नावडतीला घरात घेतले . पुढे तिजवर ममता करू लागला .                    
                        तर जशी नावडतीला देवी प्रसन्न झाली, तुम्हा-आम्हाला होवो हि साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण

No comments:

Post a Comment