Tuesday 14 June 2011

vatsaavitridevi

वट पौर्णिमा -जेष्ठ पौर्णिमा म्हटले कि सत्यवान -सावित्रीची कथा डोळ्या समोर येते पण हे सावित्रीदेवीचे व्रत आहे.सौभाग्यासाठी वडाची पूजा करतात.वेद जननी सावित्रीची पूजा सर्वप्रथम ब्र्ह्मानी केली नंतर सर्व देवानी केली .राजा अश्वपतीने हिची पूजा केली म्हणून हिच्या पोटी सावित्रीने जन्म घेतला तीच हि सत्यवान कथेतील सावित्री होय .पराशर ऋषींनी राजा अश्वपती व राणी माधवी कडून हे सावित्री व्रत करून घेतले होते जेष्ठ त्रयोदशी दिवशी व्रतस्थ राहून चतुर्दशी दिवशी हे व्रत करावे .मुहूर्त पाहून भक्तीने सावित्रीदेवीचे पूजन करावे हे व्रत चौदा वर्षे करावे चौदा फळे व चौदा नैवेद्य दाखवावेत.एक मंगल कलश स्थापन करून सावित्रीदेवीचे विधी पूर्वक पूजन करावे माध्यंदिन शाखे मध्ये याचे सविस्तर वर्णन आहे जगद्धाता प्रभूची प्राणप्रिया सावित्रीला ;मोक्षदा .शांता सुखदा ,सर्व संपत स्वरूपा असेही म्हणतात सर्व संपतप्रदात्री  हि देवी वेदाची अधिष्ठात्री देवी आहे षोडश  उपचारांनी हिची पूजा करावी ॐ  सावित्र्यै स्वाहा |असा जप करावा 
ब्र्ह्नादेवानी केलेली सावित्रीची स्तुती 
सचिदानन्दरूपे त्वं  मूल प्रकृति स्वरुपिणि| हिरण्यगर्भरूपे त्वं  प्रसन्ना भव सुन्दरी |
तेजःस्वरुपे परमे  परमानन्दरूपिणी| द्वि जातीनां  जातिरूपे प्रसन्ना भव सुन्दरी |
नित्ये नित्यप्रिये देवि नित्यानद स्वरुपिणि| सर्व मङ्गले  च प्रसन्ना  भव सुन्दरी |
सर्व स्वरुपे  विप्राणां  मन्त्रसारे  परात्परे | सुखदे मोक्षदे देवि  प्रसन्ना भव सुन्दरी |
विप्रपापेध्मदाहाय  ज्वलदग्निशिखोपमे | ब्र्ह्नतेज् प्रदे देवि प्रसन्ना भव सुन्दरी |
कायेन मनसा   वाचा  यत्पापं  कुरुते नरः | तत्  त्वत्स्मरण मात्रेण  भस्मीभूतं भविष्यति |

No comments:

Post a Comment