Monday, 30 May 2011

stuti



श्री चंडिकायै नमः 
जय जय हो विश्व जननी |जय जय हो प्रणव रुपिणी|
जय जय दैत्य दलिनीमूळप्रकृती महामाये |
जय जय दश मुख विराजिनीजय जय अष्टादश भुजा धारिणी |
जय जय अष्ट भुजा कमल लोचनी  त्रय रुपात्मिका देवी |
तू  रूपे धरुनी अनेक | दुष्टासी शासन करिसी देख |
आणि निजभक्तासी रक्षक | होसी नारायणी तू |
त्रिप्रकाराची देवी जाणविश्वरूप सर्व आपण |
चंडीका  दुर्गा भद्रा म्हणोन |बहु नामे वर्णिती |
जय अखिलार्थदायक  भगवती | तव नाम स्मरण आणिता चित्ती |
सर्व विघ्नाची  होऊनी शांती | पुरती इष्ट मनोरथ |
ऐसा देवी तव महिमा | कळे वेदादिकासी सीमा | 
लीन होऊनी स्वये ब्रह्मा |तव चरणी स्थिरावला |
जय  जय अंबिके शंकर प्रिये | मूळप्रकृती महामाये | 
तव नाम स्मरणे संकट जाये | तृणअग्नीन्यायवत |
जय भवदुःख विनाशिके | भक्त पालके दुष्टातंके|
उत्पती स्थिती  संहारके | जय अंबे तुज नमो |
तू  अनंत अवतार धरुनी |दुष्ट जना करिसी शासन | 
आणि नीज दासाचे  रक्षण | आनंदे करिसी अंबे तू |
नमो देवी भवानीअखिल जगतत्रय जननी |
हरिहर ब्रह्मादी कालागुनी | इच्छा मात्रे  वर्तविसी |
आणि सृष्ठिचा  दुर्गम | चालविसी अनुक्रम | 
त्या तुज माये प्रमाणे | जगन माते सर्वदा |

Wednesday, 25 May 2011


श्री योगेश्वरी देवी 
या रक्त दन्तिका नाम देवी प्रोक्ता मयानघ |तस्याः स्वरुपम्  वक्ष्यामि शृणु सर्वभयापहम्|
रक्ताम्बरा रक्तवर्णा रक्तसर्वाङ्गभूषणारक्तायुधा रक्तनेत्रा  रक्त केशातिभीषणा|
रक्ततीक्ष्णनखा रक्तदशना रक्तदन्तिकापतिं नारीवानुरक्ता  देवी भक्तं भजेज्जनम्|
वसुधेव विशाला सा सुमेरुयुगलस्तनीदिर्घौ लम्बावतिस्थुलौ  तावतीव  मनोहरौ|
कर्कशावतिकान्तौ  तौ सर्वानन्दपयोनिधि|भक्तान् संपाययेद्देवि  सर्वकामदुघौ स्तनौ|
खड्गं पात्रं च मुसलं  लाङ्गलं च बिभ्रर्ति सा| आख्याता रक्त चामुण्डा देवी योगेश्वरिति च|
अनया व्याप्तंखिलं  जगत्स्थाव जङ्गमम्| इमां यः पुजयेभ्दक्त्या  स व्याप्नोति चराचरम्|
अधीते य इमां नित्यं रक्तदन्त्या वपुःस्तवम्|तं सा परिचरेद्देवी  पतिं  प्रियमिवाड्गना|

Tuesday, 24 May 2011

Bodan Kuldharm kulaachar


                              बोडण 

       कोकणस्थ समाजात लग्न कार्य नंतर किंवा मुलगा झाल्यावर घरात देवीचे बोडण करण्याची पद्धत आहे. मंगळवार शुक्रवार प्रमाणेच इतर कोणत्याही वारी बोडण करणेस हरकत नाही, तसेच कोणत्याही महिन्यात(गुरु शुक्रास्तात सुद्धा) करणेस हरकत नाही. एका वेळेस दोनापेक्षा जास्त साठवून करू नये.बोडण हा कुलधर्म कुलाचार म्हणूनच केला जातो. योगेश्वरी देवीच्या भक्तामध्ये कोकणस्थ प्रामुख्याने आहेत. बोडण म्हणजे देवीची कृतज्ञता व्यक्त करण्याचे व पूजा करण्याचा रिवाज आहे. या वेळी घरातील सुवासिनी व बाहेरच्या चार व कुमारिका पूजेसाठी आवश्यक आहेत. या पूजेत कुमारिकेचे महत्व जास्त आहे, कारण योगेश्वरी हि कुमारिका देवी आहे.


                         कहाणी बोडणाची 

आटपाट नगर होते . तिथे एक गरीब ब्राह्मण होता . त्याला दोन सुना होत्या . एक आवडती  दुसरी नावडती होती . आवडतीला घरात ठेवणीतले चांगले चांगले खायला प्यायला देत . चांगले ल्यायला - नेसायला देत , तसे नावडतीला काही करीत  नसत . तिला गोठ्यात ठेवीत , फटके - तुटके नेसायला देत , उष्टमाष्ट खायला देत , असे नावडतीचे हाल होत असत .
                      एके दिवशी कुळधर्म कुळाचार आला , तशी ब्राह्मणाच्या बायकोने बोडणाची तयारी केली . सुवासिंनींना बोलावणे केले . पुढे तिने देवाची पूजा केली . सगळ्याजणींनी मिळून बोडण भरले , कहाणी वाचली . पुढे देवीला नैवेद्य दाखवला . नंतर सर्व माणसे जेवली . नावडतीला उष्टमाष्ट  वाढून दिले . तेव्हा तिला समजले , कि आज घरात बोडण भरले . नावडतीला रडू  आले , कि मला कोणी बोडण भरायला बोलावले नाही . सर्व दिवस तिने उपवास केला . रात्री देवाची प्रार्थना केली   ती झोपी गेली .  
कहाणी बोडणाची 

आटपाट नगर होते . तिथे एक गरीब ब्राह्मण होता . त्याला दोन सुना होत्या . एक आवडती  दुसरी नावडती होती . आवडतीला घरात ठेवणीतले चांगले चांगले खायला प्यायला देत . चांगले ल्यायला - नेसायला देत , तसे नावडतीला काही करीत  नसत . तिला गोठ्यात ठेवीत , फटके - तुटके नेसायला देत , उष्टमाष्ट खायला देत , असे नावडतीचे हाल होत असत .
                      एके दिवशी कुळधर्म कुळाचार आला , तशी ब्राह्मणाच्या बायकोने बोडणाची तयारी केली . सुवासिंनींना बोलावणे केले . पुढे तिने देवाची पूजा केली . सगळ्याजणींनी मिळून बोडण भरले , कहाणी वाचली . पुढे देवीला नैवेद्य दाखवला . नंतर सर्व माणसे जेवली . नावडतीला उष्टमाष्ट  वाढून दिले . तेव्हा तिला समजले , कि आज घरात बोडण भरले . नावडतीला रडू  आले , कि मला कोणी बोडण भरायला बोलावले नाही . सर्व दिवस तिने उपवास केला . रात्री देवाची प्रार्थना केली   ती झोपी गेली .  
                             रात्री नावडतीला स्वप्न पडले .एक सवाशीण स्वप्नात आली , तिला पाहून नावडती रडू लागली . ती नावडतीला म्हणाली " मुली मुली , रडू नको , घाबरू नको . पटकन कशी उगी राहा . रडण्याचे कारण सांग ! "
                         नावडती म्हणाली " घरात आज बोडण भरलं , मला काही बोलावलं नाही , म्हणून मला अवघड वाटले . " सुवासिंनीने " बर " म्हटले . नावडतीला जागी केली . तिला सांगितले , " उद्या तू गोठ्यात दहीदूध विरजून ठेव . एक खडा मांड , देवी म्हणून त्याची पूजा कर . तू एकटीच बोडण भर . संध्याकाळी गाई गुरांना खाऊ घाल . "
इतके सांगितले  ती नाहीशी झाली . नावडती पुढे जागी झाली , जवळपास पाहू लागली . तो तिथे कोणी नाही . नावडती मनात समजली , कि देवीने दर्शन दिलंयपुन्हा तशीच निजली . 
                     सकाळी उठली , सुवासिंनीने सांगितले तसे दहीदूध विरजून ठेवले . दुसरे  दिवशी पहाटे उठली , अंग धुतले , एक खडा घेतला , देवी म्हणून स्थापना केली , पान फुले वाहून पूजा केली . नंतर लाकडाची काथरवट घेतली . विरजून ठेवलेले दही दुध त्यात घातले .देवीची प्रार्थना केली . पुढे एकटीनेच बोडण भरले .देवीला नैवेद्य दाखविला . घरातून आलेले उष्टमाष्ट जेवण जेवली , भरलेले बोडण झाकून ठेवले . दुपारी गुरांना घेऊन रानात गेली .                      
                       इकडे काय घडले ? नावडतीचा सासरा गोठ्यात आला . झाकलेले काय आहे म्हणून पाहू लागला . लाकडाची काथरवट सोन्याची झाली . आत हिरे - माणके दृष्टीस पडले . बाहेर उडालेल्या ठिपक्यांची मोत्ये झाली .ती त्याने आत आत भरली  . मनात मोठे आश्चर्य केले . नावाद्तीने हि कुठून आणली , म्हणून त्याला काळजी पडली . इतक्यात तिथे नावडती आली ." मुली मुली " म्हणून तिला हाक मारली .  लाकडाची काथरवट तिच्या पुढे आणली . हिरे - मोत्ये दाखविले . " हि तू कुठून आणलीस ? " म्हणून विचारले . नावडतीने  स्वप्न सांगितले " त्याप्रमाणे मी बोडण भरलेते हे झाकून ठेवले , त्यांचे हे असे झाले ,काय असेल ते पाहून घ्या . " म्हणून म्हणाली . सासरा मनात ओशाळा झाला .नावडतीला घरात घेतले . पुढे तिजवर ममता करू लागला .                    
                        तर जशी नावडतीला देवी प्रसन्न झाली, तुम्हा-आम्हाला होवो हि साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण