Monday, 23 May 2011

Kulswamini Manaspuja.


Yogeshwaridevi

yogeshwaridevi

mul murti

mul sthan

jayanti view

mukundraj samadhi

samadhi place

shiv lene

temple parisar

श्री योगेश्वरी देवीची आरती

जय देवी जय देवी जय योगेश्वरी |  महिमा कळे तुझा वर्णिता थोरी  || धृ ||
पतितपावन सर्व तीर्थ महाद्वारी | माया मोचन सकाळ माया निवारी |
 साधका सिद्धी वाणेच्या तीरि | तेथील महिमा वर्णू शके वैखरी || ||
सिद्धलिंग स्थळ परम पावन | नरसिंह तीर्थ तेथे नृसिंह वदन |
मुळपीठ रेणागिरी नांदे आपण | संतांचे माहेर ते गोदेवी स्थान || ||
महारुद्र जेथे भैरव अवतार | काळभैरव त्याचा महिमा अपार|
नागझरी तीर्थ तीर्थाचे सार | मार्जन करता दोष होती संहार || ||
अनंतरूप शक्ती तुज योग्य माते |  योगेश्वरी नाम त्रिभुवनी विख्याते |
व्यापक सकळा देही अनंत गुणभरिते | नीळकंठ  ओवाळू कैवल्या माते || || 

स्थान परिचय 
१२ ज्योतिर्लिंगांपैकी प्रसिद्ध स्थान म्हणजे परळी वैजनाथ  .  हे ठिकाण आंबेजोगाई पासून २६ कि. मी. वर बीड जिल्ह्यात येते  . परळी हे गाव ब्रह्मा , वेणू सरस्वती नद्यांच्या शेजारी असून त्यास " कान्तिपुर ", " मध्यरेखा वैजयंती " किंवा " जयंती " या नावाने हि ओळखले जाई .
                              आंबेजोगाई च्या योगेश्वरी देवी चे परळी च्या वैद्यानाथा समवेत विवाह ठरला होता . पण लग्नाची वरातमुहूर्त टळून गेल्यावर पोहचल्याने त्या  सर्व माणसांचे दगडात रुपांतर झाले . अशी आख्यायिका सांगितली जाते . त्यामुळे लग्न झाल्याने आंबेजोगाईला कुमारी देवी मानतात.
                           शिव पुराणातील कथेनुसार , मार्कंडेयास अल्प आयुष्य लाभले होते. परंतु परळी वैद्यानाथाच्या वरदानाने  मार्कंडेयास दीर्घायुष्य  लाभले.
तसेच सत्यवान सावित्री ची कहाणी  हि याच क्षेत्रात घडली . नारायण पर्वतावरील तो वटवृक्ष आज हि आहे . इथे वटेश्वर महादेवाचे मंदिर आहे.
चांगुणा चिलया यांची प्रसिद्ध कहाणी हि याच क्षेत्रात घडली .



Saturday, 21 May 2011

Yogeshwari Deviche Varanan.

श्री चंडिकायै नमः 

जय जय हो विश्व जननी | जय जय हो प्रणव रूपिनी ||
जय जय दैत्यदलिनी | मूळ प्रकृती महामाये ||
जय जय दशमुखविराजीनी | जय जय अष्टादशभुजा धारिणी ||
जय जय अष्टभुजा कमल लोचनी | त्रय रुपात्मिक देवी ||
तू रूपे धरुनी अनेक | दुष्टासी शासन करिसी देख ||
आणि निज भक्तासी रक्षक | होसी नारायणी तू ||

आदि मायेचे प्रमुख आठ अवतार आहेत. ते असे:
१ महाकाली 
२ महालक्ष्मी 
३ महासरस्वती
४ नंदा 
५ रक्तदंतीका
६ शताक्षी 
७ भीमा 
८ भ्रामरी

आता रक्तदन्तिका जियेचे नाम | चंडिका बोलिजेली उत्तम ||
सांगतो तिचे रूप परम | पाप नाशक असे ते ||
रक्तासारिखे वसन सुरेख | तैसीची रक्तवर्णा सम्यक ||
तदुपरि रक्त भूषणे देख | रक्तांगी ती शोभत असे ||
रक्तासारिखी आयुधे जाण | तैसेची असती जियेचे नयन ||
जियेचे केश रक्तवर्ण | अतिभ्यासुर दिसताती ||
रक्तासारिखी नखे सम्यक | रक्तासारिखे दशन देख ||
जिच्या रक्त दाढा सकळीक | रक्त उपचार प्रिय जिला ||
पतिव्रता जैसी पतीते | सेवीत असे अनुरक्ते ||
तैसी रक्तदन्तिका भक्तसेवेते | तत्पर राहे अनुदिनी ||
पन्नास कोटी योजने केवळ | पृथ्वीसारिखी जी विशाल ||
मेरूसारिखे स्तनयुगल | दीर्घ लंब स्थूल अति ||
ते रक्तदंतीकेचे स्तन | अत्यंत मनोहर जाण ||
कर्कश अति शोभायमान | सदानंद पयोनिधी ||
सर्व कामाते करिती दोहन | ऐसे जियेचे असती स्तन ||
भक्ता कारणे संपादन | करिती जाहली देवी ती ||
खड्ग पात्र मुसल लांगल | ती चतुर्भुजी धरी तत्काल ||
रक्त चामुंडा आख्या केवळ | होती जाहली तियेची ||
देवी योगेश्वरी जाणे | हि जियेची अभिधाने ||
सकळ जग व्यापिले इणे | स्थावर जंगमात्मक पाही ||
दनुवंशी जे जन्मले | दानव ऐसे नाम पावले ||
त्या सर्वाते भक्षिले | दंते चाविले क्षणार्धे ||
तेव्हा दाडीम्बीच्या पुष्पा परि | दंत रक्त जाहले सत्वरी ||
तै रक्तदन्तिका हे चराचरी | नाम होते जाहले ||
या रक्त दंतीकेचे पूजन | भावे करी जो आपण ||
तो चराचराते व्यापून | मान्य होय सर्वासी ||
तैसेची जो भावे निश्चित | इचे स्तवन करी सतत ||
त्याची देवी सेवा करीत | जैसी पतिते पतिव्रता ||